– माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
गेल्या काही दिवसांपासून आपण प्रतिकुल हवामान अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस ढगाळ हवामान, गारपीट याचा त्यात समावेश आहे. आता येते काही दिवस हवामान नक्की कसे असेल याविषयी जाणून घेऊया…
मराठवाडा वगळता मुंबईसह कोकणातील ४ जिल्हे व विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, व वाशिम ते गडचिरोली अश्या ११ जिल्ह्यात तसेच
मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते कोल्हापूर, सांगली, सोलापूरपर्यन्त अश्या ११ जिल्ह्यात परवा गुरुवार दि. ३० व ३१ मार्च असे २ दिवस ढगाळ वातावरणसहित अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
अर्थात शेतकऱ्यांनी अति भिती बाळगण्याचे कारण नाही. केवळ सावधानता बाळगावी असे वाटते. विदर्भात त्यापुढेही २ दिवस म्हणजे २ एप्रिल पर्यन्त वातावरणाची तीव्रता जाणवू शकते. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मात्र स्वच्छ व कोरडे वातावरण असण्याची शक्यता जाणवते.
परवा गुरुवार दि.३० मार्चपासुन महाराष्ट्रात काहीसे वाढलेले दुपारच्या तापमानात पुन्हा घसरण होवून वातावरण पुन्हा पूर्ववत आल्हाददायक वाटू शकते.
वैष्णोदेवी, काश्मीर व्हॅली, बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला कुलू मनाली, देहाराडून थेट अमृतसर व सभोंवतालचा परिसरात तेथे २९ मार्च ला रात्री येणाऱ्या पश्चिमी प्रकोपामुळे तेथेही गुरुवार ३० मार्च पासुन ३ दिवस पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता जाणवते. तिकडे जाणाऱ्या पर्यटकांनी ह्याचीही नोंद घ्यावी असे वाटते.
Alert Maharashtra Rainfall and Cloudy Sky Weather Forecast Climate