पुणे – आपल्या मोबाईल मध्ये अनेक ॲप्स असतात. या ॲपचा वापर केल्याने आपली विविध कामे सोपी होतात, परंतु त्याचबरोबर काही अॅप धोकेदायक देखील असतात. या अॅप्सचा मोबाईल मध्ये शिरकाव झाल्यास आपल्याला फायदा होण्याची प्रचंड प्रमाणात नुकसान देखील सहन करावे लागते. याचा आपल्याला मानसिक आणि आर्थिक देखील फटका बसू शकतो. त्यामुळे याबाबत प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांचा सल्ला
जोकर मालवेअर सायबर हल्ल्यांसाठी ओळखले गेले आहे. सायबर सिक्युरिटी फर्मच्या अॅनिलीसीस (विश्लेषक ) शिश्कोवा, यांनी जोकर मालवेअर परत येण्याबद्दल चिंता व्यक्त करत ट्विटर अलर्ट जारी केला आहे. जोकर मालवेअर गुगल प्ले स्टोअरमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे जवळपास १५ अँड्रॉईड अॅप्सना बाधा झाली आहे. ते वापरण्यास सुरक्षित नाही. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे 15 धोकादायक अॅप्स असतील तर ते लगेच डिलीट करा. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
गुगल प्ले स्टोअरवर यादी
गेल्या वर्षी जोकर अॅप्समुळे अनेक अॅप्सना संसर्ग झाला होता. यानंतर परिस्थिती खूपच खराब झाली होती, त्यामुळे गुगलने मोठ्या प्रमाणावर अॅप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकले होते. अशी अॅप्स २०१७ पासून गुगल प्ले स्टोअरवर आहेत. गुगल प्ले स्टोअरवर यादीत दिलेले (सूचीबद्ध केलेल्या ) अनेक अॅप्स, ज्यांना वापरण्यास धोकादायक असल्याचे वर्णन केले गेले आहे, तसेच ५० हजारांहून अधिक वेळा ते डाउनलोड केले गेले आहेत.
काय आहे हा मालवेअर
जोकर मालवेअर अत्यंत धोकादायक प्रकार मानला जातो. ते कोणत्याही मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये अत्यंत गुप्त मार्गाने प्रवेश करतात आणि अगदी गुपचूप राहतात. जोकर अॅप्स तुमच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय मोबाइलवरून प्रीमियम सेवांचे सदस्यत्व सक्रिय करतात. हे गुगल सिक्युरिटीला बायपास करते. हे अॅप्स गुगल अॅप्सवर सूचीबद्ध आहेत. तसेच त्यांना बनावट रेटिंग आणि कमेंट्स दिल्या जातात. जेव्हा वापरकर्ते हे अॅप्स डाउनलोड करतात, तेव्हा विकसक हे अॅप्स अपडेट करतात आणि मालवेअर टाकतात. तेव्हा धोका निर्माण होतो.
हे आहेत धोकादायक अॅप्स
इझी, पीडीएफ, स्कॅनर, नाऊ, क्यूआरकोड स्कॅन, सुपर-क्लिक, व्हीपीएन, व्हॉल्यून, बूस्टर, लाऊडर, साउंड इक्वलायझर, बॅटरी चार्जिंग, अॅनिमेशन, बबल इफेक्ट्स, स्मार्ट टीव्ही, रिमोट, व्हॉल्यूम, बूस्टिंग, हिअरिंग अॅन्ड फ्लॅशलाइट, फ्लॅश, अॅलर्ट कॉल, हॅलोवीन, कलरिंग, क्लासिक, इमोजी, कीबोर्ड, सुपर हिरो, फोटो एडीटर, इझी फोटो आदि त्याची नावे आहेत.