मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील पुढील पाच दिवसांसाठी हवामानविभागाने इशारा दिला आहे. त्यात उष्णतेची लाट आणि मेघगर्जना अशा दोघांचा समावेश आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या काळात ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट तीव्र असेल. तर, आज दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणच्या काही भागात मेघगर्जनेची शक्यता आहे.
उष्णतेची लाट येणार असल्याने त्यासंदर्भातील विविध नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
28 April: पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. या काळात ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता.
आज दक्षिण मध्य महाराष्ट्र,दक्षिण कोकणच्या काही भागात मेघगर्जनेची शक्यता
Pl follow Heatwave guidelines@CMOMaharashtra pic.twitter.com/CNUIVZxhmb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 28, 2022
शुक्रवारी (२९ एप्रिल) विदर्भातील अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असेल.
शनिवारी (३० एप्रिल) आणि रविवार (१ मे) अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या चार जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट असेल. त्यामुळे या राज्यांनी हवामान विभागाकडून दिल्या जाणाऱ्या अपडेटसकडे लक्ष द्यावे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.