पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळ्याच्या प्रारंभीच हवामान बदलाने जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपीटीने तडाखा दिल्यानंतर आता पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतमालाचे आतोनात नुकसान झाले आहे. आता पुन्हा इशारा देण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
येत्या सोमवारी म्हणजेच १३ मार्च रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, वीजांचे कडकडणे, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सूचना व इशाऱ्यांकडे बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1633905835704299520?s=20
Alert IMD Forecast Unseasonal Rain Gusty Winds