सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावधान! देशभर ताप, सर्दी, घसादुखीचे रुग्ण हे करा… १५-१५ दिवस रुग्ण बेजार… हे करु नका…

by India Darpan
मार्च 7, 2023 | 1:18 pm
in मुख्य बातमी
0
Cough Fever1 e1678174868647

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या प्राणघातक संसर्गानंतर आता देशभरात फ्लूच्या नवीन रुग्णांची नोंद होत आहे. हा फ्लू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आता याबाबत इशारा दिला आहे. डॉ गुलेरिया यांनी सांगितले की, हा विषाणू थेंबांद्वारे पसरतो. सध्या या फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ताप, घसादुखी, अंगदुखी आणि नाकातून पाणी येणे ही त्याची लक्षणे आहेत. हा एक प्रकारचा इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त नसल्याने याबाबत काळजी करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सतत खोकला किंवा कधीकधी ताप येण्याचे प्रमुख कारण इन्फ्लुएंझा-ए च्या H3N2 उपप्रकारामुळे होते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून देशात ही समस्या कायम आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या तज्ज्ञांनी याचे श्रेय इन्फ्लुएंझा-एच्या उप-प्रकार H3N2 ला दिले आहे.
ICMR शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, H3N2 गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. इतर उपप्रकारांच्या तुलनेत, यामुळे प्रभावित अधिक लोकांना रुग्णालयात दाखल केले जाते. त्यांनी विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लोकांसाठी काय करावे आणि करू नये याची यादी देखील जारी केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देखील देशभरात खोकला, सर्दी आणि मळमळण्याच्या वाढत्या प्रकरणांमध्ये अँटिबायोटिक्सच्या अंदाधुंद वापराविरूद्ध एक सल्ला जारी केला आहे. असा हंगामी ताप पाच ते सात दिवस राहतो, असे त्यात नमूद केले आहे.
IMA च्या अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्सच्या स्थायी समितीने सांगितले की, बहुतेक प्रकरणांमध्ये ताप तीन दिवसांत बरा होतो. तथापि, खोकला तीन आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. वायूप्रदूषणामुळे व्हायरलचे प्रमाणही वाढले आहे. बऱ्याच रुग्णांना ताप, सर्दी आणि घसा खवखवणे याचा तब्बल १५ दिवस त्रास होत आहे. बहुतेक १५ वर्षांपेक्षा कमी आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये हा त्रास आढळत आहे. यामुळे तापासह श्वसन संस्थेलाही संसर्ग होत आहे.

अशी घ्या काळजी
– सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला
– नियमितपणे हात धुवा आणि सार्वजनिक ठिकाणी हात हलवणे आणि थुंकणे टाळा
– डोळे आणि नाकाला स्पर्श करणे टाळा
– खोकताना तोंड आणि नाक झाका
– प्रदूषित ठिकाणी जाणे टाळा
– भरपूर पाणी प्या
– अंगदुखी किंवा ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्या

Alert H3N2 Flu Infection Nationwide Patient IMA Precaution

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अबीर, गुलाल, फुले…. होळी आणि धुळवडीनिमित्त असा रंगले उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर (बघा अप्रतिम व्हिडिओ)

Next Post

अवकाळी पाऊस, गारपीटीची सरकारकडून दखल; मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले हे निर्देश

India Darpan

Next Post
cm eknath shinde2 e1702802722219

अवकाळी पाऊस, गारपीटीची सरकारकडून दखल; मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011