मुंबई – भारतात गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन किंवा डिजिटल आर्थिक व्यवहारात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आजच्या जमानात स्मार्टफोनद्वारे पेमेंट न केलेली व्यक्ती विरळच. परंतु डिजिटल पेमेंट दिसायला जितके सोपे आहे, तितकेच कधी कधी धोकादायकही होऊ शकतात. यूपीआय पेमेंटचे जितके फायदे, तितके नुकसानही आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाही, पण सतर्क राहणे गरजेचे आहे. तुम्ही गुगल पे वापरा किंवा फोन पे वापरा, त्यासाठी खाली सांगितल्या जाणार्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर कंगाल व्हायला काहीच वेळ लागणार नाही.
यूपीआय अॅड्रेस शेअर करू नका
अनेक नागरिकांना ही चूक केल्यानंतर पश्चाताप होतो. कृपया तुम्ही ही चूक करू नका. आपले यूपीआय अकाउंट सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणालाही आपला यूपीआय अॅड्रेस, तुमचा फोन नंबर, क्यूआर कोड किंवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस यांच्यात काहीही होऊ शकते. कोणत्याही बँक अॅप्लिकेशनच्या माध्यमातून कोणालाही तुमच्या यूपीआय अकाउंटपर्यंत पोहोचण्याची परवानगी दिली नाही पाहिजे.
बळकट स्क्रिन लॉक
सोपा स्क्रिन लॉक किंवा पासवर्ड, पिन क्रमांक सेट करण्याची चूक वापरकर्ते नेहमीच करतात. तुम्ही अशी चूक करू नका, बळकट पासवर्ड सेट करा. तुम्हाला सर्व आर्थिक व्यवहारासाठी अॅपवर एक बळकट स्क्रिन लॉक सेट करावा लागेल. गुगल पे किंवा पे फोन अॅपवर पिन सेट करताना तुमचा वाढदिवस अथवा वर्ष, मोबाईल नंबरचे अंक सेट करू नये. तुमचा पीसी कोणाशीही शेअर करू नका. तुमचा पिन उघड झाल्यास तो त्वरित बदलणे योग्य ठरेल.
संशयास्पद लिंक किंवा अनोळखी कॉल
समजून न घेता कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणे धोक्याचे ठरू शकते. यूपीआय घोटाळा करणे आता सामान्य तंत्र झाले आहे. त्याचा वापर हॅकर्स करतात आणि वापरकर्त्यांची फसवणूक करतात. कोणतेही हॅकर्स साधारण लिंक शेअर करतात किंवा कॉल करतात. वापरकर्त्यांना व्हेरिफिकेशनसाठी थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करण्यासाठी सांगतात. तुम्ही अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. किंवा कोणतीही माहिती शेअर करू नका. बँका कधीच पिन, ओटीपी किंवा खासगी माहिती विचारत नाहीत. अशा प्रकरणांमध्ये सतर्क राहणे गरजेचे आहे.
एकापेक्षा अधिक अॅप
स्मार्टफोनमध्ये अनेक पेमेंट अॅप ठेवणेसुद्धा धोकादायक ठरू शकते. असे न करता एखाद्या विश्वासार्ह अॅपचा वापर करणे संयुक्तिक ठरेल. एकापेक्षा अधिक यूपीआय किंवा ऑनलाइन व्यवहार अॅपचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक डिजिटल पेमेंट अॅप यूपीआय व्यवहाराला परवानगी देतात. त्यामुळे कोणते अॅप कॅशबॅक आणि पुरस्कारसारखे चांगले लाभ प्रदान करतात हे पाहावे.
नियमित अपडेट करा
वापरकर्ते अनेकदा एखादे अॅप वापरतात परंतु ते अपडेट ठेवत नाहीत. असे अॅप वापरताना नेहमीच अपडेट ठेवत राहा. यूपीआय पेमेंट अॅपसह प्रत्येक अॅप लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपग्रेड करावे. नवे अपडेट चांगली सुविधा आणि लाभ देतात. अपडेट नेहमी बग फिक्ससुद्धा आणतात. अॅप्स लेटेस्ट व्हर्जन अपग्रेड केल्याने तुमचे अकाउंट सुरक्षित राहू शकेल.