नाशिक – आज ३१ डिसेंबर असल्याने सरत्या २०२१ या वर्षाला निरोप आणि २०२२ या वर्षाचा आरंभ साजरा करण्यासाठी जवळपास सर्वच उत्सुक असतात. नाशिककरांनीही त्याचे नियोजन केले आहे. मात्र, कोरोना निर्बंधांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता आता नाशिक शहर पोलिसांनी यासंदर्भात इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडून जर थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा मनोदय असेल तर तो तुम्हाला बदलावा लागेल. कारण, पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी जमण्यास बंदी आहे. त्याशिवाय नाशकात रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा घरातच थर्टी फर्स्ट साजरा करावा लागणार आहे. तसेच, शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. यासंदर्भात नाशिक पोलिसांनी काढलेले हे आदेश बघा