मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिशय प्रतिकुल हवामानाची लाट राज्यात आली असल्यामुळे पुढील पाच दिवस अतिशय तीव्र हवामानाचे राहमार आहेत. असा स्पष्ट इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, येते पाच दिवस राज्यात तीव्र हवामान सक्रीय राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, लगतच्या मराठवाड्याच्या भागात गडगडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. तर, येत्या २ ते ३ दिवसांनंतर काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या कमाल तपमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काही शहरांमध्ये तर पारा ४३ अंशांपुढेही गेला आहे. अंगाची लाही लाही होत असल्याने नागरिक हैराण आले आहेत. कडाक्याच्या उष्म्याला तोंड देत असतानाच आता हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1518178015896739840?s=20&t=MoDtXMqFLAN5vuprs-S3ZQ
सोमवारी (२५ एप्रिल) जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पाऊस होण्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी (२६ एप्रिल) उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नांदेड, अहमदनगर, जळगाव, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, परभणी, सांगली या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी (२७ एप्रिल) मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता जवळपास सर्व राज्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.