मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सिलिंडरचे दर जाहीर करण्यात येतात. त्यानुसार मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच घरगुती सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयाने वाढ झाल्याचा धक्का सामान्यांना बसला आहे. त्याचसोबत अन्यदेखील महत्त्वपूर्ण बदल आजपासून लागू झाले असून त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होणार आहे.
आज १ तारखेला सिलिंडरचे नवे दर जाहीर झाले असून घरगुतीमध्ये ५० आणि व्यावसायिकमध्ये ३५० रुपयांची वाढ झाली आहे. याची झळ सामान्य नागरिक तसेच हॉटेल, रेस्टॉरंटचालकांना बसणार आहे.
आजपासून आरबीआयने एमसीएलआर दर वाढवल्याने त्याचा परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणार आहे. आरबीआयने यापूर्वी रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर अनेक बँकांनी त्यांचे एमसीएलआर दर वाढवले आहेत. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. एमसीएलआरच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. आता लोकांना बँकांना ईएमआय देताना जास्त रक्कम मोजावी लागणार लागणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात एकूण १२ दिवस बँक सुट्टी असेल. मात्र, यामध्ये राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्यांमध्ये बदल असू शकतात. मार्चमध्ये रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच हजार मालगाडी आणि प्रवाशीगाड्यांच्या समावेश असणार आहे.
सरकारने काही दिवसांपूर्वीच आयटी नियमांमध्ये बदल केलेत. त्यानुसार, ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना आता भारतात नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.
Alert Big Changes from Today 1 March 2023