मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आज अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मातल्या मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान, स्नान, पूजा आणि आराधना केल्यास चांगले फळ मिळते. या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. सोन्या-चांदीचे दागिने घरी आणल्यास आपल्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते, असे मानले जाते. या शुभमुहूर्तावर तुम्हाला कमी खर्चात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, तर आम्ही तुम्हाला एक चांगला पर्याय सांगणार आहोत. तो म्हणजे तुम्हाला फक्त १ रुपयामध्ये डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता येणार आहे.
घरबसल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता येणार आहे. हे ९९९ कॅरेटचे शुद्धतेचे सोने आहे. हे डिजिटल सोने तुम्ही ऑनलाइन विकूही शकता. इलेक्ट्रॉनिक रूपातील सोने ईटीएफ, गोल्ड सेव्हिंग फंड इत्यादीच्या माध्यमातून खरेदी करणे म्हणजे डिजिटल सोने होय. एमएमटीसी-पीएएमपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (MMTC-PAMP India Pvt.Ltd), ऑगमोंट गोल्ड लिमिटेड ( Augmont Gold Ltd) आणि डिजिटल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड (Digital Gold India Pvt.Ltd) या देशातील तीन मुख्य कंपन्यांमध्ये डिजिटल सोन्यात गुंतवणूक करता येणार आहे.
डिजिटल गोल्ड उत्पादनांमध्ये कमाल होल्डिंगचा काळ असतो. त्यानंतर गुंतवणूकदारांना सोने डिलिव्हरी घ्यावी लागते किंवा ते पुन्हा विक्री करावे लागते. डिजिटल गोल्ड ३६ महिन्यांपेक्षा कमी काळासाठी आपल्याजवळ ठेवावे लागते. त्यामुळे परतावा मिळताना त्यावर कर लागणार नाही. डिजिटल गोल्डची खरेदी तुम्हाला पेटीएम, गुगल पे आणि फोन पे सारख्या अॅपवरूनही करू शकता येणार आहे.
कशी कराल खरेदी
– सोन्याचे नाणे खरेदी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल पे, पेटीएम, फोन पे सारख्या अॅपवर अकाउंट तयार करावे लागेल.
– त्यानंतर तुम्हाला गोल्ड पर्याय निवडावा लागेल.
– पैसे जमा करून तुम्हाला सोने खरेदी करता येऊ शकेल.
– तुमचे सोने मोबाईल वॉलेटच्या गोल्ड लॉकरमध्ये सुरक्षित राहील.
– महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हे सोने विक्री करता येणार आहे किंवा भेटवस्तू म्हणून कोणालाही देता येणार आहे.
– सोने विक्री करायचे असेल तर सेल बटन क्लिक करा.
– जर तुम्हाला भेट म्हणून द्यायचे असेल तर ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये गिफ्ट बटन निवडा.