इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘ओमएमजी २’ चित्रपटाची पोस्टर्स नुकतीच प्रदर्शित झाली. पण या पोस्टमधील अक्षय कुमारचा लूक पाहून नेटकरी संतापले. यातील एका पोस्टरमध्ये अभिनेता अक्षय कुमार भगवान शंकराच्या अवतारात दिसत आहे. तर, दुसऱ्या पोस्टरमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी हा त्याच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. ‘ओएमजी २’ची ही दोन्ही पोस्टर्स अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. मात्र, हे पोस्टर पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
२०१२ मध्ये हिट झालेल्या ‘ओएमजी’ चित्रपटाचा ‘ओएमजी २’ हा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. त्याचीच दोन पोस्टर्स नुकतीच प्रदर्शित झाली.
‘ओएमजी’ या चित्रपटात अक्षय कुमार श्रीकृष्णाच्या भूमिकेत होता. तर आता सिक्वेलमध्ये अक्षय भगवान शंकराच्या रूपात दिसणार आहे. कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षांची माळ अशा शंकराच्या अवतारात अक्षय पोस्टरमध्ये दिसत आहे. ‘ओएमजी २’ ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येईल.” तर पंकज त्रिपाठी असलेला दुसरे पोस्टर शेअर करत अक्षयनं लिहिलंय, ‘सत्याच्या मार्गावर भेटू.’
नेटकऱ्यांची टीका
अक्षयच्या या पोस्टवर चांगलीच टीका होते आहे. सध्या बॉलीवूडमध्ये हिंदू धर्माविषयी काही ना काही उलटसुलट दाखवलं जातं. तसंच काही या चित्रपटात असेल तर काही खैर नाही. कारण बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये जेव्हा पाहतो तेव्हा त्यात हिंदू धर्माविषयी अपमानजनक चित्रण दाखवले जाते. तुमच्याकडून चांगली अपेक्षा आहे. जय महाकाल.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं थेट इशाराच दिला आहे. ‘हिंदू धर्माचा अपमान केला तर विचार करा काय होईल?” ‘आता ‘आदिपुरुष’नंतर भगवान शंकराबरोबर चेष्टा नको.” असे एकाने म्हटले आहे.
अभिनेत्री यामी गौतम देखील ‘ओएमजी २’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘ओएमजी 2’ आणि गदर-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. सनी देओलचा गदर-2 हा चित्रपट देखील ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. अक्षयचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘सेल्फी’ हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता त्याच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.