इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एका बाजूला दर्जेदार चित्रपटांची मारामार सुरू असताना बॉलीवूडला बॉयकॉटची घरघर लागली आहे. त्यामुळे मोठमोठाले बजेट असलेले चित्रपट दणादण आपटत आहेत. परिणामी, निर्माते कलाकार चिंतेत आहेत. अक्षय कुमार हा बॉलीवूडमध्ये टॉपच्या कलाकारांमध्ये गणला जातो. अक्षयच्या आताच्या बहुतेक चित्रपटांनी बॉलीवूडमध्ये चांगली कामे केली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले अक्षय कुमारचे ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षाबंधन’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. तर त्याचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षय कुमारसह ‘राम सेतू’ या चित्रपटाशी संबंधित इतर आठ जणांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ‘राम सेतू’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून ते संतापले आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वीसुद्धा अक्षय कुमारवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.
सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये लिहिलं, ‘मुंबई चित्रपटसृष्टीतील लोकांना खोट्या आणि चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांना बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल माहिती देण्यासाठी मी अक्षय कुमार आणि राम सेतूशी संबंधित आठ लोकांविरुद्ध वकील सत्य सभरवाल यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.’
https://twitter.com/Swamy39/status/1563678446961963008?s=20&t=mVUHAv_mdpzDvHkqLgyOSQ
‘राम सेतू’ या चित्रपटात अक्षय कुमारने एका पुरातत्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. राम सेतू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, याचा तपास तो चित्रपटात करत असतो. यामध्ये अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्यादेखील भूमिका आहेत. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
https://twitter.com/akshaykumar/status/1488080793964806146?s=20&t=IyHXwQpWVdu2a5cOM6I8Xw
Actor Akshay Kumar Movie Ram Setu Controversy
Bollywood Boycott Trend