अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील पारस येथे अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मंदिराच्या शेडवर मोठे झाड कोसळले. मंदिरात आरती सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ३७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
रविवारी झालेल्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पारस गावात टिनाच्या शेडवर कडुलिंबाचे झाड पडले. या घटनेत शेड कोसळले. काही वेळातच घटनास्थळी राडा झाला. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सांगितले की, या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ हून अधिक जण जखमी झाले आहे. घटनेच्या वेळी शेडखाली सुमारे ४० लोक उपस्थित होते, त्यापैकी ३६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतांची संख्या सात झाली आणि एक जण गंभीर जखमी झाला.
अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत ७ भाविक ठार तर २३ जण जखमी झाले आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, अकोला जिल्ह्यातील पारस येथे एका धार्मिक समारंभासाठी काही लोक एकत्र आले असता, टिनाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
फडणवीस पुढे म्हणाले की, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी ते समन्वय ठेवून आहेत. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. काही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींवर बाळापूर येथे उपचार करण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
पारसची (जि. अकोला) घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे. शेडवर झाड कोसळले. त्यानंतर शेड कोसळून 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, 37 लोक जखमी आहेत. आमच्या संवेदना या परिवारांच्या सोबत आहेत. रात्री मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. जखमींना चांगले वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजे, अशी… pic.twitter.com/amIkSKrDl3
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 10, 2023
Akola Tree Collapse on Temple Shed 7 Death 37 injured