नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -अखिल ब्राह्मण समाजासाठी कार्यरत असलेल्या आणि आपला सुवर्णमहोत्सव साजरा करीत असलेल्या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. जुन्नर येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी मधुकर त्र्यंबक भिडे यांनी बिनविरोध निवड झालेल्या एकवीस कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. संस्थेचे अध्यक्ष म्हणून अॅड. अविनाश भिडे कार्यवाह म्हणून सुभाष सबनीस कार्याध्यक्षपदी उदयकुमार मुंगी, अनिल देशपांडे कोषाध्यक्ष सहकार्यवाह म्हणून अॅड. सतीश बालटे उपाध्यक्षपदी जुन्नर येथील चंद्रशेखर जोशी आणि पुण्याचे कुंदन कुमार साठे, तसेच सुहास शुक्ल, गंगाधर कुलकर्णी, सचिन पाडेकर यांची विश्वस्त म्हणून तर कार्यकारणी सदस्य म्हणून प्रवीण कुलकर्णी, उल्हास पंचाक्षरी, एडवोकेट समीर जोशी, पुण्याचे एडवोकेट संयोगिता पागे, सारंगधर अभ्यंकर, अनिल शिदोरे, परेश मेहंदळे, मानसी फडके, फलटण येथील चंद्रशेखर दाणी, सुभाष कुलकर्णी आणि जुन्नर येथील मुकुंद राक्षे यांची निवड झाली.
यावेळी बोलतांना नुतन अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांनी सांगीतले की, अखिल ब्राह्मण समाजासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे भरीव कार्य करून संस्थेचे कार्य सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करू आणि गेले पन्नास वर्षे संस्थेच्या जुन्या जाणत्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा वारसा पुढील काळातही जपण्यासाठी प्रयत्नशील राहू. उदयकुमार मुंगी यांनी संस्थेच्या सर्व सभासदांनी निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा कायम ठेवली याबद्दल त्यांचे आभार मानले.