नाशिक – अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरही कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे सावट असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या या नव्या अवताराने जगभरात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच नाशिकमध्ये ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. कोरोना संसर्गामुळेच हे संमेलन पुढे ढकलण्यात आले होते. आता संसर्ग आटोक्यात आल्यानंतर त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी आडगाव येथील भुजबळ नॉजेल सिटीमध्ये हे संमेलन होत आहे. त्यातच दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा अवतार ओमिक्रॉन आढळून आला आहे. हा अवतार अतिशय धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
ओमिक्रॉनची दखल घेत राज्य सरकारनेही नवीन मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही तातडीने कोरोना आढावा बैठक घेतली आहे. योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच आता साहित्य संमेलन होत असल्याने जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. त्यामुळेच ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच संमेलनस्थळी प्रवेश दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जाहीर केले आहे. तसेच, सहभागी होणाऱ्यांना मास्क सक्ती तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी