इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – तेलंगाणातील एमआयएम पक्षाचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी हे अकबराच्या कबरीवर नतमस्तक झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, भाजप आमदार नितेश राणी यांनी ओवेसी यांच्यावर अतिशय कठोर टीका केली आहे. तसेच, त्यांना आव्हानही दिले आहे. या पार्श्वभूमीवर ओवेसी हे औरंगाबादच्या आजच्या सभेत काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ओवेसी यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, कुत्र्यांचे कामच भुंकणे असते. तर, सिंह हा स्वतःची गर्जना करीत पुढे जात असतो. त्यामुळे आपण कुणाच्याही जाळ्यात अडकू नका. भुंकणाऱ्यांना भुंकू द्या, असे ते म्हणाले.
बघा त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1525013078785818624?s=20&t=gbB9h0IKgSiXXYw3av_Uew