मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अग्रगण्य भारतीय एक्सआर स्टार्टअप अजनालेन्स आपल्या नाविन्यतेसाठी ओळखला जातो. कंपनीने त्यांचे नवीन डिवाईस अजनाएक्सआर प्रो व अजनाएक्सआर एसई मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट्स लाँच केले. या अत्याधुनिक डिवाईसेसच्या लॉन्चसह डिजिटल व फिजिकल विश्वांना एकत्र करत सर्वोत्तम तंत्रज्ञानामधील नवीन अध्यायाची सुरूवात होत आहे.
अजनाएक्सआर प्रो व अजनाएक्सआर एसईचे सादरीकरण अजनालेन्सच्या इनोव्हेशन प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. हे हेडसेट्स इमर्सिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रात धुमाकूळ निर्माण करण्यास सज्ज आहेत. अजनाएक्सआर प्रो मध्ये ड्युअल २.१-इंच डिस्प्लेसह ४५६० x २२८० चे आकर्षक रिझॉल्यूशन आहे. २५६ जीबी स्टोरेज क्षमता व शक्तिशाली ५५०० एमएएच बॅटरीसह वापरकर्ते विनाव्यत्यय इमर्शनचा दीर्घकाळापर्यंत आनंद घेऊ शकतात.
अजनालेन्सचे सह-संस्थापक व सीओओ अभिजीत पाटील म्हणाले, अजनालेन्समध्ये आमचा असे भविष्य निर्माण करण्याचा मनसुबा आहे, ज्यामध्ये समाजात सुधारणा होतील आणि आपल्याला अधिक यश मिळवण्यास मदत होईल. हे भविष्य साध्य करण्यास आमचे अजनाएक्सआर एसई व अजनाएक्सआर प्रो डिवाईसेस मदत करतील. या डिवाईसेसमधून प्रशिक्षण, अध्ययन व मानवी विकासामधील मर्यादांना दूर करण्याप्रती आणि भारताच्या नाविन्यपूर्ण परिवर्तनाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आमचा आपल्या अध्ययन पद्धतीमध्ये, तसेच कुशल होण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा उद्देश आहे. या डिवाईसेसमध्ये भारतातील प्रत्येक व्यक्तीला स्किल-फर्स्ट करण्याची क्षमता आहे.”
वापरकर्ते इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून कोणत्याही डिवाईसवर एक्सआर टूल्स व कन्टेन्ट अॅक्सेस करू शकतात. डिवाईसमधील मर्यादांना दूर करणारी अजनालेन्सची स्वत:ची क्लाऊड-आधारित कम्प्युटिंग सर्विस अजना वर्कस्टेशन सर्वोत्तम अध्ययन व अनुभव देते. प्रमुख व्यासपीठ अजना टॅलेंट प्लॅटफॉर्म एक्सआर कन्टेन्ट व पोर्टफोलिओची माहिती देते, तसेच क्रिएटर्सना एक्सआर टॅलेंटचा शोध घेत असलेल्या उद्योगांमधील टॉप कंपन्यांशी कनेक्ट करते.
Ajnalens has launched these new pro headsets.
Mobile Technology Accessories