शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अजितदादांना ३६ तासांचा अल्टिमेटम…पक्षचिन्हाबाबत खुलासा करण्याची तंबी

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2024 | 1:47 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Ajit Pawar


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वर्षभरापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बंडखोरी केली. ४० आमदारांना घेऊन ते भाजपबरोबर महायुतीत सामील झाले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात पक्षचिन्हाबाबत धाव घेतली होती. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना ३६ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या ३६ तासांत अजित पवारांना पक्षचिन्हाबाबत खुलासा करणारी सूचना राज्यातील वर्तमानपत्रांत छापायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाला ३६ तासांच्या आत मराठी दैनिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ चिन्हाचाबाबत अस्वीकरण प्रसिद्ध केले जाईल, असे आश्वासन दिले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तोंडी निर्देशाला उत्तर देताना अजित पवार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी हे आश्वासन दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने दाखल केलेल्या अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. या अर्जाद्वारे शरद पवार यांनी अजित पवार यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी १९ मार्च आणि ४ एप्रिल रोजी न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व प्रचार सामग्रीमध्ये ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर खटल्याच्या निकालाच्या अधीन असल्याचे अस्वीकरण समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. शेवटच्या सुनावणीत (२४ ऑक्टोबर) न्यायालयाने अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीसाठीही पूर्वीचे आदेश पाळले जातील, असे हमीपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. पुढे, खंडपीठाने त्यांच्या आदेशांचे उल्लंघन केले गेले तर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.

आजच्या सुनावणीत सिंग यांनी दावा केला, की राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या सर्व अटींचे पालन करत आहे. नवीन हमीपत्र प्रकाशित करण्यासाठी वृत्तपत्रांशी संपर्क साधला आहे. यावर न्यायालयाने म्हटले, की तुम्ही वृत्तपत्रांमध्ये डिस्क्लेमर प्रकाशित करण्यासाठी वेळ का घेत आहात? आम्ही तुम्हाला दिवस देत नाही आहोत, आम्ही विचारत आहोत, की तुम्ही हे किती तासांत करू शकता?” असा सवाल न्यायमूर्ती कांत यांनी केला. सिंग म्हणाले की, “दोन-तीन दिवसांत ते करता येईल. न्यायमूर्ती कांत सिंग यांना म्हणाले, “२४ तासांच्या आत, किंवा जास्तीत जास्त ३६ तासांत तुम्ही वृत्तपत्रांमध्ये अस्वीकरण प्रकाशित करा.”

मागील सुनावणीवेणी सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाने स्पष्ट केले होते, की अजित पवार गट लोकसभा निवडणुकीसाठी घड्याळ हे चिन्ह वापरू शकतो; मात्र हे चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असून निकालाच्या अधीन असल्याचे त्यांना जाहीर करणे बंधनकारक असणार आहे. अजित पवार गटाने प्रचाराच्या सर्व जाहिरातींवर त्यांना दिलेले घड्याळ चिन्हाखाली प्रकरण न्यायप्रविष्ट असून निकालाच्या अधीन आहे, असे जाहीर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीदरम्यान आदेश दिले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बोलायचा ठेका फडणवीसांनी दिला का? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला राज ठाकरे यांचा समाचार

Next Post

आजपासून नितीन गडकरी यांचे झंझावाती दौरे; महाराष्ट्रभरात ५० सभांचे नियोजन

Next Post
Nitin Gadkari e1708960950705

आजपासून नितीन गडकरी यांचे झंझावाती दौरे; महाराष्ट्रभरात ५० सभांचे नियोजन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011