इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
स्व. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी अजितदादा आणि आमदार रोहित पवार यांची भेट झाली. दोघांमध्ये यावेळी संवादही झाला. हा संवाद मात्र नंतर चर्चेचा विषय ठरला.
या भेटीत अजित पवार यांनी काका या नात्याने हक्कानं रोहित पवार यांना खाली वाकून नमस्कार करायला लावला. त्यानंतर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर मराठी संस्कृती आहे. आम्ही लवकर आलो असतो तर, साहेबांची (शरद पवार) यांची भेट झाली असती. आम्ही दर्शन घेतलं असतं..टायमिंग जुळलं नाही. मी डिपार्टमेंटवरही चिडलो. रोहितला मी शुभेच्छा दिल्या. या भेटीत अजित पवार यांनी रोहित पवार यांना सांगितले की, अरे ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. बेस्ट ऑफ लक असे म्हटले. या प्रश्नावर रोहित पवार यांनी सुध्दा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले नक्कीच अजित पवार यांची सभा झाली असती तर वर – खाली झालं असते. उलटंही होऊ शकलं असतं, पण, ते बारामतीमध्ये अडकून पडले होते. त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत. निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. चांगील गोष्ट आहे. मी त्यांचे अभिनंदन देखील केले,
तर या भेटीबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात म्हटले आहे की, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी प्रितीसंगम म्हणजे पवित्र स्थळ. चव्हाण साहेबांनीच एक सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती जपण्याचे संस्कार महाराष्ट्रावर केले. त्यानुसारच आज प्रितीसंगमावर अजितदादांजी भेट झाली. त्यांची राजकीय वाटचाल स्वतंत्र दिशेने सुरु असली तरी त्यांचा राजकीय अनुभव आणि वयाचा कायमच आदर आहे. त्यानुसार आजच्या भेटीदरम्यानही निवडणुकीतील यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतले.
या लिंकवर बघा व्हिडिओ
https://twitter.com/RRPSpeaks/status/1860917581688742349