नाशिक – सांगली शहरातील पुराने बाधित स्टेशन चौक परिसराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भेट दिली. त्यानंतर स्टेशन चौक परिसरातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगली शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना राबविण्याबाबत चर्चा केली. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यांनी यावेळी बोटीतून सुध्दा पूरग्रस्त भागाची पाहणी केली.