पुणे – राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने राज्य सरकारने कलम १४४ लागू करुन संचारबंदी सुरू केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही गर्दी दिसून येत आहे. याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण कलम १४४ लागू केले आहे. त्याचे योग्य पालन झाले नाही तर गेल्या वर्षी सारखा कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असा गंभीर इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. राज्यातील स्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. कडक निर्बंधांचे पालन कुठल्याही स्थितीत होणे आवश्यक आहे. त्यातच सर्वांचे हित आहे. जर तसे झाले नाही तर पूर्ण बंदीचाच पर्याय उरतो, असेही पवार म्हणाले.
https://twitter.com/ANI/status/1383092091039879171