इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभागी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन सध्या भाजप नेत्यांनी त्यांना घेरले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर सध्या टीका केली जात आहे. मात्र, अजित पवारांनी विधिमंडळात नेमकं काय वक्तव्य केलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अजित पवार विधानसभेत म्हणाले की, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.’बाल शौर्य पुरस्कार’ हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा.छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे पवारांनी सांगितले.
बघा त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ
आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा.छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही.#हिवाळीअधिवेशन२०२२ pic.twitter.com/PrG5icBJHZ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 30, 2022
Ajit Pawar Speech Sambhaji Maharaj Statement Video