विशेष प्रतिनिधी, नाशिक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर होते. शहर परिसरात त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा त्यांनी घेतला. दुपारच्या सुमारास पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रकारची माहिती दिली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे
अजित पवार म्हणाले की,
– स्टेट टास्क फोर्सने सांगितले आहे की तिसरी लाट तिशीच्या आतल्यांना धोका.
– कोरोना संसर्गाबाबत सर्वांनी अधिक काळजी घ्यावी
– औषध बदलत आहेत. रेमडेसिव्हिर परिणामकारक नाही.
– काही इंजेक्शन ६० हजार रुपयांचे आहेत.
– नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. सर्वांचीच जबाबदारी आहे.
– ऑक्सिजन कमी पडणार नाही याचे नियोजन सुरू आहे
– नाशिकसह अनेक जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा ५० टक्क्यापेक्षा कमी पेरण्या झाल्या आहेत. पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते
– खताची कमतरता नाही. सरकारचे बारकाईने लक्ष आहे
– शेतकऱ्यांमुळेच देशाचा जीडीपी अजूनही उत्तम आहे
– लग्न सोहळ्यात कोरोनी निर्बंधाचे उल्लंघन व्हायला नको
– महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालेल. आमचा उत्तम समन्वय आहे.
– पोलिसांच्या कार्याला डाग लावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे ऐकून सीबीआय चौकशीची मागणी होते आहे
– चंद्रकांत दादांसारखी माणसे वैफल्यग्रस्त झाली आहेत. त्यामुळे ते काहीही ठराव आणि मागणी करतात
– महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. यापुढेही सरकार तसेच काम करेल
– जे चुकतील त्यांच्यावर कारवाई होईलच
– महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांसोबत. शेतकरी अडचणीच्या कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी होणार नाही
– विरोधी पक्षाच्या नेत्यांजवळ कुठलेही महत्त्वाचे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते काहीही वक्तव्य करतात
– ओबीसी आरक्षणासाठी पंतप्रधानांना विनंती केली की जनगणनेची आकडेवारी व माहिती द्या. ते देतील, अशी अपेक्षा आहे.
– शेकडो, हजारो वर्षांच्या परंपरेचा आदर करणे आवश्यक आहे म्हणूनच वारीसंदर्भातील योग्य निर्णय सरकारने घेतला आहे
– देशात स्मार्ट सिटीची अनेक कामे रखडली आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे कामे खोळंबली शिवाय निधीचाही प्रश्न आहे.
पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=970613863772391&id=103446941470343