विशेष प्रतिनिधी, पुणे
विशेष विमानाने नगर जिल्ह्यासाठी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन गुपचुप आणणाऱ्या भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टोला लगावला आहे. सध्या विखे पाटील यांची ही धाडसी कृती संपूर्ण राज्यातच चर्चेची ठरली आहे.
लोकप्रतिनिधी असले तरीही रेमडेसिवीरचा साठा करणे अयोग्य आहे, असा शाब्दिक टोला पवार यांनी लगावला आहे. कोणीही असले तरी सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करून ते जनतेच्या हिताचे आहे का, हे तपासून पुढील निर्णय घ्यावे, असेही पवार म्हणाले.
बघा पवार काय म्हणाले ते
https://twitter.com/NCPspeaks/status/1386966600046112769