गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अजित पवारांचं मोठ वक्तव्य… १६ आमदार अपात्र झाले तरी सरकार पडणार नाही…. चर्चांना उधाण

मे 15, 2023 | 8:45 pm
in राज्य
0
Ajit Pawar e1672410885664

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सगळ्यांचे लक्ष विधानसभा अध्यक्षांकडे लागले आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, १६ आमदार अपात्र झाले तरी सरकार पडणार नाही. त्यांच्याकडे बहुमत आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे. कारण, ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे की, हे सरकार लवकरच कोसळणार आहे. आणि आता अजित पवार यांनी त्याविरुद्ध वक्तव्य केले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करुन कोणत्या व कुणी लढवाव्यात यावर सविस्तर चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीत झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

दरम्यान लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका होतील. एकदा निवडणूका लागल्यावर धावपळ व्हायला नको म्हणून त्याबद्दलही चर्चा बैठकीत झाल्याचे अजित पवार म्हणाले. कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार रविवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीतील चर्चेची माहिती जयंत पाटील, संजय राऊत, नाना पटोले यांनी माध्यमांना दिलीच आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकाच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात दोनवेळा सरकार आणि वेगवेगळ्या राज्यात सरकारे आली त्यामुळे भाजपमध्ये उत्साह पहायला मिळायचा. मात्र यामुळे विरोधक नाऊमेद झाले होते. १३ मे रोजी कर्नाटकचा निकाल आला आणि एक्झिट पोलचे अंदाजही चुकले. कॉंग्रेसने १३५ पर्यंत मजल मारली त्यामुळे विरोधकांचा उत्साह द्विगुणित झालेला पहायला मिळाला. पुढची लाईन ऑफ एक्शन महाविकास आघाडीची महाराष्ट्रात काय असली पाहिजे आणि कशा पद्धतीने राहिलेली वज्रमूठ सभा झाली पाहिजे यावर चर्चा झाली. याशिवाय मागच्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन निवडणूका लढवल्या होत्या. यावेळी महाविकास आघाडी करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला असेही अजित पवार यांनी सांगितले.

निवडणूकांतील जागा वाटप म्हटल्यावर तिन्ही पक्ष नावे देणार आहेत. त्यातून बैठक होईल. त्यासाठी तिन्ही पक्षातील दोघे जण अशी सहा जणांची समिती स्थापन करून पुढच्या लोकसभेच्या ४८ जागा व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप कसे करायचे. याशिवाय फक्त तीनच पक्ष नाही तर या तिन्ही पक्षांशी संबंधित मित्रपक्ष आहेत. त्यांनाही जागा वाटपात बरोबर घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे आज शिवसेनेच्या सदस्यांनी अर्ज दाखल केला. अध्यक्ष आल्यावर त्यांना उपाध्यक्ष माहिती देतील आणि विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय देतील अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

अकोला येथील घटनेत सोशल मिडियामध्ये काही क्लीप व्हायरल झाल्या. त्यामध्ये काही समाजाच्या भावना दुखावणारी घटना होती. त्यातून एक ग्रुप आक्रमक झाला. त्यानंतर ही घटना घडली आहे. वास्तविक राज्यसरकारने या गोष्टींना आवर घातला पाहिजे. कुणी क्लीप व्हायरल केली याची शहानिशा केली पाहिजे. अलीकडे सायबर गुन्हे वाढले आहेत. अशावेळी तपास यंत्रणांच्या हातात खूप काही बाबी असतात. ही क्लीप कुणी व्हायरल केली, यामागे मास्टरमाईंड कोण होता, त्याचा उद्देश काय होता, यासर्व खोलात तातडीने गेले पाहिजे. हे एका ठिकाणी झाले उद्या ते दुसरीकडे होऊ शकते. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारच्या हातात असणाऱ्या पोलीस यंत्रणेकडे असते. पोलिस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप न होता अशा प्रकारच्या चौकशा पूर्ण करण्यासाठी मुभा दिली तर पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करू शकते. हा पाठीमागचा अनुभव आहे असेही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar on 16 MLA Disqualification

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला तालुक्यात शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन

Next Post

गुलाबराव पाटलांची भाषा नरमली… आता म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत एकटा राहून मी काय केलं असतं?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Ndr dio News Gulabrao Patil 24 Nov 2022 12 scaled e1733059155240

गुलाबराव पाटलांची भाषा नरमली... आता म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत एकटा राहून मी काय केलं असतं?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011