नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज वंदे भारत ट्रेनने नाशिकमध्ये दाखल झाले. समर्थक आमदारांच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झाल्यानंतर पवार हे प्रथमच नाशिकला आले. त्यामुळे त्यांचे मोठ्या जल्लोषात नाशिकमध्ये स्वागत करण्यात आले. गेल्या आठवड्यात शरद पवारांनी नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन केले होते. त्याला आजच्या शक्तिप्रदर्शनातून अजित पवार उत्तर देण्यात आले.
सकाळी सहा वाजता ठाणे रेल्वे स्थानकाहून अजित पवारांनी वंदे भारत ट्रेननं नाशिककडे प्रवास सुरू केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. नाशिकला आल्यानंतर रेल्वे स्थानकावरच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थितीत होते.