गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम २००२ (सुधारणा) विधेयक २०२४ विधानपरिषदेत मंजूर…

by Gautam Sancheti
डिसेंबर 19, 2024 | 8:52 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 2024 12 19 201643 840x420 1

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या देशाने ‘एक देश एक कर’ ही संकल्पना स्वीकारली आहे, त्याच माध्यमातून ‘जीएसटी’ करप्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक सवलती, अनुदानाच्या योजना राबविण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह कृषीक्षेत्राशी निगडीत खते, बी-बियाणे, औषधांवरील ‘जीएसटी’तून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘जीएसटी’ परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत ‘जीएसटी’च्या अनुषंगाने सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. राज्यातल्या ‘जीएसटी’ कर संकलनात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशातल्या एकूण कर संकलनापैकी 16 टक्के करसंकलन एकट्या महाराष्ट्रातून होते. देशांतर्गत एकूण कर संकलनात महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. यामुळे राज्यातल्या ‘जीएसटी’ करप्रणालीत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. राज्याच्या सीमेलगतच्या भागातून होणारी कर चुकवेगिरीचे प्रकार थांबविण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येईल.

महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम 2002 (सुधारणा) विधेयक, 2024’ मंजूर
‘महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम 2002 (सुधारणा) विधेयक, 2024’ आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या माध्यमातून राज्य शासनाचा महसूल वाढवण्यार भर देण्यात आला आहे. या विधेयकानुसार सध्याच्या महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, 2002 मधील कलम 37 नुसार वसुलीबाबत राज्याचा प्रथम भार विशिष्ट शर्तीच्या अधीन राहून होता. या विधेयकांच्या सुधारणेनुसार महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, 2002 अंतर्गत विनाशर्त प्रथम भार स्थापित झाल्यानंतर जलद गतीने वसुली करणे शक्य होणार आहे.

तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल खरेदी करुन व्यापारी खोल समुद्रात उभ्या असलेल्या बोटींना बॅरेलद्वारे पुरवठा करतात. हा पुरवठा अन्य पेट्रोलपंपाद्वारे केल्या जाणाऱ्या पुरवठ्याप्रमाणे गृहीत धरुन कर भरणा करण्यापासून व्यापारी सूट घेतात. या सुधारणेमुळे किरकोळ विक्री केंद्राची व्याख्या आणि किरकोळ विक्रीचे स्पष्टीकरण कायद्यात समाविष्ट होऊन कर चुकवेगिरीला रोखणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर या कायद्यातल्या कलम 2 (24) (पाच) या कलमामध्ये सुयोग्य स्पष्टीकरणाचा समावेश केल्यामुळे, एखाद्या संस्थेने किंवा क्लबने स्वतःच्या सदस्यांना केलेल्या विक्रीवर कर आकारणी शक्य होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

थंडीची लाट ओसरली का? बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

Next Post

या व्यक्तींनी रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० डिसेंबरचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० डिसेंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
Pharmacy

एसएमबीटी फार्मसीच्या ७२ जणांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड; लाखोच्या पॅकेजवर भरती

ऑगस्ट 7, 2025
क्रीडा व युवक कल्याण विभाग आढावा बैठक 1 1 scaled 1

नव्या खात्याची नवी जबाबदारी….क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी पदभार घेताच दिले हे निर्देश

ऑगस्ट 7, 2025
Screenshot 20250807 190254 Facebook

केंद्रीय अर्थमंत्री व वाणिज्यमंत्री यांची नाशिकच्या तिन्ही खासदारांनी घेतली भेट…कांदा प्रश्नांकडे वेधले लक्ष

ऑगस्ट 7, 2025
RUPALI

खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ, १४९७ नग्न फोटो…रुपाली चाकणकर यांची खळबळजनक माहिती

ऑगस्ट 7, 2025
IMG 20250807 WA0307 2

या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा सर्वोत्कृष्ट तर ही नाट्यकृती द्वितीय

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011