गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिले हे निर्देश

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2024 | 6:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
SUPRIME COURT 1


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून सामोरे जावे, तसेच शरद पवारांचे फोटो किंवा व्हिडीओ वापरू नये, असे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. तसेच स्वत:च्या पायावर उभे राहा, असा सल्लाही अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने या वेळी दिला. दरम्यान, पुढची सुनावणी आता १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात राजकीय संघर्ष सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पाळले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबद्दल ३६ तासांत वृत्तपत्रांत जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयात आज (१३ नोव्हेंबर) पुन्हा सुनावणी पार पडली.

न्यायालयात सुनावणी दरम्यान शरद पवारांच्या वकिलांनी अजित पवार गटाकडून शरद पवारांचे काही फोटो आणि व्हिडीओ निवडणुकीत वापरले जात असल्याचा आरोप केला. यावर न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले आहे, की अजित पवार आणि शरद पवार यांचे वैचारिक मतभेद आहेत. तसेच दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे व्हिडीओ किंवा फोटो अजित पवार गटाने वापरू नये, यासाठी तुमच्या पदाधिकाऱ्यांना परिपत्रक जारी करा. तसेच एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून तुम्ही तुमची ओळख निर्माण करा. स्वत:च्या पायावर उभे राहा, असे न्यायालयाने अजित पवार गटाला म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात राजकीय संघर्ष सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डुप्लिकेट सलमान, शाहरुख व नाना पाटेकर ने केला काँग्रेसचा प्रचार

Next Post

इंदिरा गांधी आल्या, तरी ३७० लागू होणे अशक्य…अमित शाह यांची टीका

Next Post
amit shah11

इंदिरा गांधी आल्या, तरी ३७० लागू होणे अशक्य…अमित शाह यांची टीका

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011