इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलला २१ पैकी २० जागा मिळाल्या तर सहकार बचाव पॅनलला अवघी एक जागा मिळाली. या पॅनलचे चंद्रकांत तावरे हे एकमेव उमेदवार विजयी झाले. शरद पवार यांच्या बळीराजा पॅनलचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला. तर कष्टकरी पॅनललाही एकही जागा मिळाली नाही.
या निवडणुकीसाठी २२ जुन रोजी मतदान झाले. त्यानंतर ३५ तास मतमोजणी चालली. आता या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वत.ला चेअरमनचे उमेदवार जाहीर करुन या निवडणुकीत संचालकपदासाठी उमेदवारी केली व त्यात ते निवडून आले. आता ते चेअरमन होणार हे स्पष्ट आहे.
या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनलची मुख्य लढत ही चंद्रकांत तावरे यांच्या पॅनलसोबत होती. त्यांनी ८५ व्या वर्षी या निवडणुकीत उडी घेऊन मोठे आव्हान तयार केले होते. पण, त्यांच्या पॅनलला अवघी एकच जागा मिळाली.