शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

छावा चित्रपट टॅक्स फ्री करा…नाशिक दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या संस्थेने केली मागणी

by India Darpan
फेब्रुवारी 16, 2025 | 8:04 pm
in संमिश्र वार्ता
0
image1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करा अशी मागणी ‘सुविचार मंच’चे संयोजक आकाश पगार यांनी उप मुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे केली आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेले राज्याचे उप मुख्यमंत्री ना.अजित पवार यांची आकाश पगार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले. ना.अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी बोलतांना दिले.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणार आणि जीवनचरित्रावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी दि.१४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि सिनेचाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहाबाहेर येणारे प्रेक्षक डोळ्यातून अश्रू ढाळत असल्याचेही दिसून आले. अंगावर शहारे आणणारे प्रसंग आणि तितकेच दमदार डायलॉग हे शिवभक्तांचे रक्त सळसळ करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्र भूमीत जन्मलेला या दोन्ही महाराजांनी अखंड हिंदुस्थानचा इतिहास रचला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपट सर्वसामान्य जनतेला मोठ्या पडद्यावर अनुभवता यावा यासाठी हा चित्रपट टॅक्स मुक्त करावा अशी मागणी आकाश पगार यांनी केली आहे.

यापुर्वी देखील महाराष्ट्रात अनेकदा इतिहास तसेच महापुरुषांच्या जीवनसंघर्षावर आधारित चित्रपट टॅक्स फ्री केलेले आहेत. यापूर्वी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’’ चित्रपट, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘सत्यशोधक’ चित्रपट, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित ‘सचिन – अ बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट, एअर हॉस्टेस नीरजा यांच्या धाडसाची कहाणी असलेला ‘नीरजा’ हा चित्रपट, महिला बॉक्सर मेरी कोम यांच्या जीवनावरील ‘मेरी कोम’ चित्रपट, दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा ‘हिंदी मिडीयम’ आदी चित्रपटांना महाराष्ट्रात टॅक्स फ्रि करण्यात आल्याकडे देखील यावेळी लक्ष वेधण्यात आले.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनसंघर्षावर आधारित असणारा “छावा” चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी उप मुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी शिष्टमंडळात आकाश पगार, विशाल गांगुर्डे, सुजित सोनवणे, संकेल निमसे आदी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये सायबर भामट्याचे कॅालसेंटर पोलीसांनी केले उदध्वस्त…सहा जणांसह एका महिलेस केले गजाआड

Next Post

मध्यप्रदेशमध्ये नाशिकच्या औद्योगिक ब्रँडिगसाठी संधी…अधिकाऱ्यांची निमा हाऊसमध्ये बैठक

Next Post
IMG 20250216 WA0262

मध्यप्रदेशमध्ये नाशिकच्या औद्योगिक ब्रँडिगसाठी संधी…अधिकाऱ्यांची निमा हाऊसमध्ये बैठक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011