इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा वाढदिवासानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीच्या वेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासह पवार कुटंबियांतील सदस्य उपस्थितीत होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह प्रमुख नेते सुध्दा अजित पवार यांच्या बरोबर होते. त्यांनी सुध्दा यावेळी शुभेच्छा दिल्या.
बुधवारी अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पोहचले. अजित पवार यांनी काल भाजपच्या कोणत्याही बडया नेत्यांची भेट घेतली नाही. अमित शाह यांच्या बैठकीत देखील ते नसल्याचे समोर आले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार दिल्लीला गेले होते. अशी चर्चा सुरु झाली.
या भेटीबाबत अनेक तर्क – वितर्क लावले जात आहेत. या भेटीमागे राजकीय कारण असल्याचे सुध्दा बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षात जोरदार संघर्ष होता. त्यानंतर विधानसभेतही तो दिसला. त्यामुळे एकमेकांच्या भेटी घेणे दोन्ही नेत्यांनी टाळले. आता या निवडणुका संपल्यानंतर ही भेट घेतली गेली आहे. त्यामुळे त्यावर आता चर्चा रंगू लागल्या आहे.