गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोरोना काळात निधीची कमतरता पडू नये यासाठी अधिवेशनात ३०० कोटींची प्रस्ताव सादर करणार: उपमुख्यमंत्री

जुलै 1, 2021 | 7:51 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210701 WA0237 e1625125818180

नाशिक – आरोग्य विभागात कोरोना काळात निधीची कमतरता पडू नये यासाठी अधिवेशनात ३०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून अन्न व नागरी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग या विभागांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.. त्याचप्रमाणे देशात सर्वात जास्त लसीकरण राज्यात झाले आहे. यापुढेही जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी हाफकीन या संस्थेला लस निर्मितीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी कोरोना काळात रुग्णांची अथक सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी व डॉक्टरांना डॉक्टर दिना निमित्त शुभेच्छा देवून, सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व तिसऱ्या लाटेत स्वत:सोबत आपल्या कुटुंबाची व बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आज देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा भुमिपुजन शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार सरोज अहिरे, दिलीप काका बनकर, नितीन पवार, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, सय्यद पिंपरी गावचे सरपंच मधुकर ढिकले यांच्यासह उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल ढिकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पवार पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले, त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देवून शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचाच वारसा घेवून शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा व त्यांची फसवणूक होणार नाही यादृष्टिने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी असून त्यांना न्याय देण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास जलद गतीने विकास होण्यास मदत होईल. याकरिता सर्वांनी जातीने लक्ष दिल्यास कामाची गुणवत्ता टीकून राहण्यास मदत होईल. आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या जिद्द व चिकाटीने आपल्या विधानसभा मतदारसंघात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेवून देवळीली विधानसभा मतदारसंघ येथील प्रस्तावित असलेल्या १५ कोटींच्या क्रिडा संकुलाच्या कामासाठी ५ कोटी निधी त्वरीत उपलब्ध करून देण्यात येणार असून, क्रिडा संकुलाचे काम सुरु झाल्यानंतर उर्वरीत निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

जगभरात शेतमालाची निर्यात करणारा भारत महत्वपूर्ण देश : छगन भुजबळ
स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी खेड्यापाड्यात जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देवून कृषि क्रांती घडविली आहे. त्यामुळे आज आपला देश जगभरात शेतमालाची निर्यात करणारा महत्वपूर्ण देश बनला आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा वारसा पुढे सुरु ठेवून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी भरीव योगदान देणे महत्वाचे आहे. तसेच जिल्ह्यात अतिशय सुंदर क्रीडा संकुल उभे राहत असून यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

*या विकास कामांचा झाला शुभारंभ*
देवळीली विधानसभा मतदारसंध येथील विविध विकास कामांसाठी 51 कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये कसबे सुकने सैय्यद पिंप्री आडगांव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 4 कोटी रुपये, सैय्यद पिंप्री येथील वाल्मिकी नगर रास्ता तयार करण्यासाठी 57 लाख रुपये, सैय्यद पिंप्री ते किसान नगर रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 24 लाख रुपये, आनंदवली चांदशी मुंगसारे दरी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 10 कोटी रुपये, मुंगसारे येथील रामशेज रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 65 लाख रुपये, दरी ते चारोस्कर रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 41 लाख रुपये, माडसांगवी येथील गोडसे वस्ती रस्त्यासाठी 72 लाख रुपये, राहूरी ते करंजकर वस्ती रस्त्यासाठी 1 कोटी रुपये, विंचूर गवळी ते माडसांगवी रस्त्यासाठी 1 कोटी 66 लाख रुपये, नाशिक रोड विभाग प्रभाग क्रमांक 22 मधील विहितगाव गावठाण अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणासाठी 50 लाख रुपये व पिंपळगाव खांब जाधव वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण व पावसाळी गटार करण्यासाठी 50 लाख रुपये, नाशिक रोड विभाग प्रभाग क्रमांक 19 मधील सामनगाव रोड ते चाडेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्यासाठी 2 कोटी रुपये, प्रभाग क्रमांक 27 चुंचाळे जलकुंभ ते घरकुल रोड रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरणासाठी 1 कोटी 50 लाख रुपये व मारुती संकुल व कारगिल चौक परिसरातील रस्ते अस्तरीकरणासाठी 1 कोटी रुपये, प्रभाग क्रमांक 31 मधील दाढेगाव भोरवस्ती रस्त्यांचे व पिंपळगाव खांब येथील चिंचवाडी व कारवाडी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी 1 कोटी 50 लाख रुपये, व पाथर्डी सर्वे नंबर 307 येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी 1 कोटी 50 लाख रुपये, भगूर, नाणेगाव, पळसे रस्ता सुधारण्यासाठी 5 कोटी रुपये, दहेगांव जातेगाव, महिरावणी, ओझरखेड, गिरणारे रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रुपये, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी 2 कोटी रुपये, मौजे बेलतगव्हाण येथील भाक्षी नाल्यावर मोरी टाकण्यासाठी 25 लाख रुपये अशा 51 कोटी निधी कामे करण्यात येणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशात सलग चार दिवस नव्या कोविड बाधितांची संख्या रोज ५० हजारांहून कमी

Next Post

येणाऱ्या काळात किमान जमिनीवर अधिक क्षेत्रफळ निर्माण करण्याची आवश्यकता – उपमुख्यमंत्री

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20210701 WA0179

येणाऱ्या काळात किमान जमिनीवर अधिक क्षेत्रफळ निर्माण करण्याची आवश्यकता - उपमुख्यमंत्री

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011