नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाने दिलासा दिला आहे. पत्नी सुमित्रा पवार व सुपुत्र पार्थ पवार यांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली आहे. दिल्लीतील बेनामी ट्रब्युनलने याबाबत आदेश दिले आहे. ७ ऑक्टोंबर २०२१ मध्ये आयकर विभागाने छापा टाकून कारवाई केली होती.
या कारवाईत आयकर विभागाने १००० कोटीची संपत्ती जप्त केली होती. त्यात नरिमन पॅाइंट येथील निर्मल टॅावरसह पाच मालमत्तावर टाच आणून जप्त केली होती. त्यामध्ये एक साखऱ कारखाना आणि एक रिसॅार्टही जप्त करण्यात आले होते. या कारवाईवर अजित पवारांनी आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलंही कर चुकवलं नाही असे म्हणत न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर हा निकाल आला.
गुरुवारीच नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज अजित पवार यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.