मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटात इनकमिंग सुरु झाले आहे. पवार व ठाकरे गटाचे काही नेते त्यांच्या संपर्कात असून काहींनी भेटी घेतल्या आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटात असणारे श्रीगोंदा विधानसभेत बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार राहुल जगताप व ठाकरे गटाचे नेते अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. हे दोघेही अजित पवार गटाच्या वाटेवर आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राहुल जगताप हे शरद पवार गटात थांबले होते. तर अपूर्व हिरे हे अजित पवार गटातच होते. पण, विधानसभा निवडणुकीत ते ठाकरे गटात गेले.राज्यात आपली ताकद वाढवण्यासाठी अजित पवार हे वेगवेगळ्या पक्षातून नेते आपल्या पक्षात घेण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे ४१ उमेदवार निवडून आले. त्यामुळे त्यांची ताकदही वाढली आहे.
मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर या सर्व नेत्यांना राष्ट्रवादीत सामील करुन घेतले जाणार आहे.