बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पहाटेच्या शपथविधीचा खल अदानींच्या घरी…अजित पवार यांचा गौप्यस्फोट

by India Darpan
नोव्हेंबर 12, 2024 | 7:42 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Ajit Pawar

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपबरोबर हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती; मात्र हे सरकार अल्पावधीत कोसळले. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच तो शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता. आज त्यांनी पहाटेच्या शपथविधीची बैठक गौतम अडानी यांच्या घरी त्यांच्या उपस्थितीत झाली होती, असा आणखी एक गौप्यस्फोट केला.

राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीसाठी मोठ्या उद्योगपतीच्या घरात ही चर्चा झाली होती, असे अजितदादा म्हणाले होते. हा मोठा उद्योगपती कोण, याबाबत त्यांनी आज माहिती देताना अदानी यांचे नाव घेतले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वादळ निर्माण झाले. यामुळे या दोन्ही पक्षांची युती संपुष्टात आली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री अन्‌‍ अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या राजकीय खेळीमुळे संपूर्ण राज्यभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती; परंतु शरद पवार यांनी या युतीला पाठिंबा न दिल्याने अवघ्या ८० तासांत हे सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भाजपची साथ का दिली? त्यांना शरद पवार यांचा पाठिंबा होता का? असे प्रश्न आजही राजकीय वर्तुळात उपस्थित केले जातात.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या राजकीय समीकरणासाठी शरद पवार यांचा पाठिंबा होता. याबाबत एका मोठ्या उद्योपगतीच्या घरी चर्चाही झाली होती. त्यावर अजित पवार म्हणाले, “आमचे वरिष्ठ नेते जसे सांगतात तसे आम्ही करतो. २०१९ च्या घटनेला आता ५ वर्षे झाली. सर्वांना माहित आहे कुठे मीटिंग झाली. दिल्लीत कोणत्या उद्योगपतीच्या घरात मीटिंग झाली. पण आता जे झाले ते झाले.’’ दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीसाठी पाच बैठका झाल्याचे सांगितले जाते. या बैठकांबाबत ते म्हणाले, “हो. पाच बैठका झाल्या होत्या. मी पुन्हा सांगतो अमित शाह, गौतम अदाणी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, मी, शरद पवार या बैठकीला होते. या बैठकीत भाजपत जाण्यासाठी चर्चा झाली होती. सर्व ठरले होते; परंतु त्या घटनेची जबाबादारी माझ्यावर आली आहे. ती जबाबदारी घेतली आहे. बाकी सर्वांना मी सुरक्षित केले आहे.”

राष्ट्रवादी आणि भाजपची युती होत असताना शरद पवार यांनी नकार का दिला? त्यांनी या युतीला पाठिंबा का दिला नाही? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “शरद पवारांच्या मनात काय आहे, हे जगात कोणलाच ओळखता येणार नाही. कोणालाच नाही. मलाही नाही. माझी काकीही सांगू शकणार नाही.”

दरम्यान, या प्रकरणावर गौतम अदाणी यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. अजित पवार यांनी मुलाखतीत पाच वर्षांपूर्वीचा उल्लेख केला; मात्र अदाणी २०१७ च्या बैठकीत हजर होते, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नवी लालपरी नाशिक विभागात दाखल…टाटाच्या चेसीसवर एसटी बसेसची बांधणी

Next Post

राज ठाकरे यांच्या टीककडे दुर्लक्ष करणार, शरद पवार यांची भूमिका; अनुल्लेखाने मारण्याची पुणेरी नीती

Next Post
Sharad Pawar

राज ठाकरे यांच्या टीककडे दुर्लक्ष करणार, शरद पवार यांची भूमिका; अनुल्लेखाने मारण्याची पुणेरी नीती

ताज्या बातम्या

ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011