इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदार संघात उभे राहणार होते. त्याची चाचपणी सुध्दा त्यांनी केली होती. सिन्नर बरोबरच त्यांनी शिरुर – हवेली, पुरंदर विधासभेतही चाचपणी केली. विशेष म्हणजे ही माहिती अजित पवार यांनीच लोणी काळभोर येथील सभेत दिली.
लोकसभेत त्यांनी पराभव झाला तर बारामतीतून निवडणूक लढवणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी विविध मतदार संघात चाचपणी केली. पण, मतदारांच्या आग्रहास्तव त्यांनी बारामतीतूनच उमेदवारी अर्ज दाखल केला. पण, याअगोदर त्यांनी तीन मतदार संघात चाचपणी केली होती. पण, त्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला.
अजित पवार म्हणाले की, बारामतीतून उभं राहणार नव्हतो, शिरुर – हवेलीतून उभं राहण्यासाठी नादवलेलो. शिरुर, पुरंदर, सिन्नर विधानसभेत संधी होती. पण, त्यानतंर ते बारामतीत उभे राहिले. यावेळी त्यांनी आता तुम्ही माझी काळजी करुन नका, बारमतीकर पाहून घेतील, तेथील परिस्थिती सुधारलीय असेही सांगितले.