मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पहिली ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत बड्या नेत्यांचा व विदयामान आमदारांचा समावेश आहे. महायुतीमध्ये भाजपने अगोदर ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर शिंदे गटाने ४५ उमेदवारांची यादी काल जाहीर केली. आता अजित पवार गटाने ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली. एकुण महायुतीचे १८२ उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले असून १०६ उमेदवारांची यादी अद्याप बाकी आहे.
पहिल्या यादीत या उमेदवारांना संधी
बारामती – अजित पवार
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
अमरावती – सुलभा खोडके
इंदापुर – दत्तात्रय भरणे
पिंपरी – अण्णा बनसोडे
पाथरी – निर्मला विटेकर
मावळ – सुनील शेळके
येवला – छगन भुजबळ
कागल – हसन मुश्रीफ
सिन्नर – माणिकराव कोकाटे
श्रीवर्धन – अदिती तटकरे
उदगीर – संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
माजलगाव – प्रकाश सोळंखे
वाई – मकरंद पाटील
खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर – संग्राम जगताप
इंदापुर – दत्तात्रय भरणे
अहमदपुर – बाबासाहेब पाटील
कळवण – नितीन पवार
कोपरगाव – आशुतोष काळे
अकोले – किरण लहामटे
वसमत – राजू नवघरे
चिपळून – शेखर निकम
जुन्नर – अतुल बेनके
मोहोळ – यशवंत माने
हडपसर – सरोज अहिरे
चंदगड – राजेश पाटील
दिंडोरी – नरहरी झिरवाळ
मुंब्रा- कळवा – नजीब मुल्ला