नाशिक – उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी नाशिक दौ-यावर असून सकाळी ८ वाजता त्यांचे ओझर विमातळावर आगमन होणार आहे. मुंबई विमानतळावरुन ते सकाळी ७.१५ वाजता निघणार आहे. नाशिकमध्ये ते सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अॅड. माणिकराव कोकटे यांची मुलगी व जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी यांच्या विवाहसोहळ्या निमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थितीत राहणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ते कोरोना व खरीप आढावा बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप त्यांचा पूर्ण दौरा आलेला नाही. त्यात त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम असणार आहे.
दहा तासाच्या या दौ-यानंतर ते सायंकाळी ६.१५ वाजता ओझर विमानतळावरुन पुणे येथे रवाना होणार आहे.
असा आहे त्यांचा दौरा