मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मी एक या देशाचा नागरिक आहे. मी संविधान, कायदा मानणारा आहे त्यामुळे माझी जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी आहे अशी स्पष्ट भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली. पुन्हा एकदा तुमची चौकशी होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हे प्रकरण २०१२ पासूनचे आहे. प्रत्येकवेळी अजित पवारांचे नांव येते. अजित पवार आणि ७५ लोक मात्र त्या ७५ लोकांची नांवे येत नाही फक्त अजित पवार यांचे नाव, फोटो, हेडलाईन होते. मात्र त्यांचे सरकार आहे काय चौकशी करायची ती करा असेही अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
माझी चौकशी सहकार विभागामार्फत, निवृत्त न्यायाधीशांमार्फत, सीआयडी, एसीबी आणि आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली मात्र आता आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग चौकशी करणार अशी पुन्हा बातमी कानावर आली आणि तुमच्या माध्यमातून वाचली, पाहिली परंतु याबाबत मला माहिती नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.