पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधीत कोट्यवधींची माालमत्ता आयकर विभागाने अटॅच केली आहे. रात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर आय़कर विभागाची ही मोठी कारवाई समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा दुसरा धक्का बसला आहे. आयकर विभागने उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबधीत असलेल्यांना आयकर विभागाने ९० दिवसांचा अवधी दिला असून त्यात ही मालमत्ता गैरमार्गाने कमावलेली नसल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. ही संपत्ता १००० कोटीचे असल्याचे बोलले जात आहे. त्यात गोव्यातील रिसॉर्ट असून त्याची किंमत आहे २५० कोटी रुपये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील २७ वेगवेगळ्या जमिनी ज्यांची किंमत जवळपास ५०० कोटी सांगण्यात येत आहे, त्याचप्रमाणे जरंडेश्वर साखर कारखान्याची ६०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीमधील फ्लॅटही अटॅच करण्यात आला आहे. यासोबत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं मुंबई येथील कार्यालयही अटॅज केले आहे.