बारामती – रोखठोक आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये चक्क रिक्षा चालवली. त्याचे फोटोही सर्वत्र व्हायरल झाले. पण, अजित पवार यांनी ही रिक्षा का चालवली असाही प्रश्न सर्वांना पडला. बारामती येथे दौ-यावर असतांना त्यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या पियाजियो कंपनीला भेट दिली. या कंपनीने इलेक्ट्रिक रिक्षाची निर्मिती केली आहे. या कंपनीच्या याच रिक्षाची चक्क ट्रायल त्यांनी रिक्षा चालवून घेतली. यावेळी त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती करुन घेतली. याअगोदर एका चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद व पान टपरी वरची भेटही चर्चेत होती. पण, आता रिक्षा चालवण्याचे प्रकार सर्वांचे लक्ष वेधून गेला.