नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलापूर खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता अजय सुहास मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची पाहणी, काही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात काही जनहित याचिकाही दाखल आहेत. चकमकींच्या संदर्भात कायदा आणि खाजगी संरक्षणाचा अधिकार या सर्व गोष्टीचा प्रकरणाच चर्चेत आल्या. हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात संवेदनशील प्रकरण आहे. त्यात आता सरकारतर्फे नाशिकचे अजय मिसर युक्तीवाद करणार आहे.
या लैगिंक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलिस कर्मचा-यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वरंक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? असे प्रश्नही विरोधकांना उपस्थितीत केले. त्यानंतर या प्रकरणात काहींनी कोर्टात धाव घेतली.
दोन मुलींवर अत्याचार
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर आता बदलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी रेल रोको, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे.