इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता अजय देवगण ‘थँक गॉड’ चित्रपटाविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे असे म्हटले आहे. चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे. अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतो आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे.
अजयच्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होते आहे. वकील मोहनलाल शर्मा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळेच आता ‘थँक गॉड’ चित्रपटाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचिकेत म्हटले आहे की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म तसेच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाऊ नये.
कायस्थ समाज हा चित्रगुप्तांचा अपमान सहन करणार नाही. जर ‘थँक गॉड’ चित्रपट प्रदर्शित झाला तर देशातील शांतता खराब होऊ शकते असे या याचिकेत म्हटले आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, न्यायालयात दाखल याचिकेमुळे हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
‘थँक गॉड’ चित्रपटाविरोधात न्यायालयात दाखल याचिकेत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे असे म्हटले आहे. चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे. आता हे सर्व प्रकरण न्यायालयात गेले आहे. चित्रपटात चित्रगुप्तांचा अपमान केल्याने कायस्थ समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हणणे असून चित्रपटाविरोधात कायस्थ समाजाचा रोष वाढत जातोय.
Ajay Devgan Thank God Film Controversy