मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकारणातील असो की बॉलीवूड मधील सेलिब्रिटी आपल्या दैनंदिन बिझी शेड्युलमधून वेळ काढून अनेकजण देवी-देवतांच्या दर्शनाला जातात, त्यातील काहीजण तर खूपच धार्मिक असून वेगवेगळ्या देव-देवतांची कट्टर भक्त आहेत.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण देखील सध्या भक्तीत लीन आहे.
अभिनेता अजय देवगण हा केरळमधील सबरीमाला मंदिरात पोहोचला होता. येथे त्याने भगवान अयप्पाची प्रार्थना केली. विशेष म्हणजे अजय देवगण इथे काळ्या कपड्यात दिसला. त्याच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, कारण चाहत्यांना अजय देवगणचा हा लूक त्याच्या आगामी चित्रपटातील असल्याचे वाटले होते, पण आता काही फोटो समोर आले असून त्यावरून स्पष्ट झाले आहे की, अजय देवगण एका कठीण भक्ती साधनेमुळे काळ्या कपड्यांमध्ये या मंदिरात पोहोचला आणि ही साधना एका दिवसाची नाही तर संपूर्ण ४१ दिवसांची आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने प्रत्येक कठोर नियमांचे पालन केले आहे.
या फोटोंमध्ये अजय देवगणने काळे कपडे घातलेले दिसत आहे. यासोबत त्यांनी गळ्यात रुमाल घातला असून कपाळावर तिलक लावला आणि गळ्यात तुळशीची माळ घातली आहे. या अभिनेत्याचे हे फोटो सोशल मीडियावर अनेकांकडून चांगलेच पसंत केले जात आहेत. तसेच अजय देवगणचा हा लूक चाहत्यांना खूप आवडतो. अजय देवगणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या प्रवासाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता धमाकेदार एन्ट्री करताना दिसत आहे.
https://twitter.com/ajaydevgn/status/1480830091273719809?s=20
एका रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण भगवान अयप्पाच्या दर्शनापूर्वी गेल्या ४१ दिवसांपासून कठोर तपश्चर्या करत होता. यादरम्यान, तो सतत काळे कपडे परिधान करत होता आणि जमिनीवर चटईवर झोपत होता. एवढेच नाही तर तो साधे जेवण घेत होता. तसेच त्याने आपले केस आणि नखे कापली नव्हती. या अभिनेत्याने आजकाल ब्रह्मचर्य पाळले, असल्याचे सांगण्यात येते.
अजय देवगण लवकरच ‘कैथी’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. अजय देवगणच्या या चित्रपट पात्राचे नाव ‘भोला’ ठेवण्यात आले आहे. दरम्यान अजय देवगणचा ‘तानाजी द अन्संग वारियर ‘ या चित्रपटातील तानाजी ची भूमिका खूपच गाजली होती तसेच ती प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.