इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लाडकी लेक न्यासा देवगण ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आणि ती कारणे देखील काही बरी नसतात. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूडमधल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्टारकिड्सपैकी ती एक आहे.
लंडनमध्ये न्यासाचा जलवा
अनेकदा न्यासा तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे ट्रोल होत असते. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसतेय. विशेष म्हणजे तिच्या या फोटोंमध्ये तिचा कथित बॉयफ्रेंड देखील दिसतो आहे. वेदांत महाजन असे त्याचे नाव आहे.
न्यासाचा खास मित्र ओरहान अवत्रमणी आणि बॉयफ्रेंड वेदांतसोबत तिने लंडनमध्ये प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. या कॉन्सर्टदरम्यान तिने खूप धमाल केली असून त्याचेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये न्यासासोबतच्या एका तरुणाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा तरुण तिचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे.
https://www.instagram.com/p/ClETA2Rov9W/?utm_source=ig_embed&ig_rid=d7648a30-4dc2-4702-b8ba-f06391b3b1e6
कोण आहे वेदांत महाजन?
काही महिन्यांपासून न्यासा २५ वर्षीय वेदांत महाजन या तरुणाला डेट करत असल्याचं समजतंय. मात्र याबद्दल तिने अद्याप कोणती प्रतिक्रिया दिली नाही. वेदांत हा कमी वयातील यशस्वी व्यावसायिक आहे. मूळचा दिल्लीचा असलेला वेदांत हा विविध बॉलिवूड पार्ट्यांचं आयोजन करतो. त्याची एक कंपनी असून त्याची सुरुवात देखील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी न्यू-इअर पार्टीचं आयोजन करत केली होती. सध्या त्याचे तो लंडनमधील युसीएल येथे शिक्षण घेतो आहे.
वेदांत महाजन हा माणक धिंग्रा आणि मोहित रावल या मित्रांसह एमव्हीएम एंटरटेन्मेंट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह-मालक आहे. ते तिघे मुंबई, दिल्ली आणि लंडनमध्ये भव्य क्लब पार्टीचे आयोजन करतात, ज्यात जान्हवी कपूर, अहान शेट्टी, माहिका रामपाल, आर्यन खान आणि निसा देवगण यांच्यासह अनेक स्टार किड्स सहभागी होतात.
https://www.instagram.com/p/Cj2-AteNB6J/?utm_source=ig_embed&ig_rid=d9d109e6-98af-4161-8610-330489ab126a
Ajay Devgan Daughter Nysa Boyfriend Vedant Mahajan