इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही महिन्यांपासून म्हणजे शाहरुख खानचा ‘पठाण’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि बॉलीवूडला एकदमच सुगीचे दिवस आल्यासारखं झालं आहे. कोरोना काळ आणि त्यानंतरही काही महिने संकटात सापडलेले बॉलीवूड आता दमदारपणे कमबॅक करताना दिसते आहे. त्यामुळे नवनवीन विषयांवरील चित्रपट पुन्हा एकदा येत आहेत. अभिनेता अजय देवगणचा एक चित्रपट मोठ्या पडद्यावर येऊ घातला आहे. अजय देवगणच्या आगामी अॅक्शन-थ्रिलरची प्रदर्शनापूर्वीच बरीच चर्चा आहे. बुकींच्या आकडे देखील हेच दर्शवत आहेत. एकंदर ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवणार असेच चित्र आहे.
‘ब्रम्हास्त्र’, ‘पठाण’, अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणले. प्रेक्षकांच्या नजरा अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटावर आहेत. ‘दृश्यम २‘ च्या यशानंतर अजय देवगण पुन्हा एकदा ‘भोला’मधून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. अजय देवगण याच्या आगामी चित्रपट भोला’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अजयने स्वतः तब्बूसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली. त्यानंतर ‘भोला’ चित्रपटाची ॲडव्हान्स तिकिटे विकली जाऊ लागली आहेत.
https://twitter.com/ajaydevgn/status/1637344022275424257?s=20
मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू झाल्यापासून अवघ्या काही तासांच्या आत देशभरात १२०० हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. या चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्येच ७ लाखांहून अधिक कमाई केली. हा चित्रपट ३० मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर हा चित्रपट १० दिवसांत आगाऊ बुकिंगच्या माध्यमातूनच मोठी कमाई करु शकतो असे चित्रपट समीक्षकांचे म्हणणे आहे.
अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा चित्रपट ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले होते आणि त्यात कार्थी मुख्य भूमिकेत होते. ‘भोला’ या चित्रपटात एका माणसाची कथा आहे. १० वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर हा माणूस आपल्या मुलीला भेटतो. परंतु त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चित्रपटात अजय देवगणशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
https://twitter.com/ajaydevgn/status/1638851185279918080?s=20
Ajay Devgan Bhola Film Booking Before Release