गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एन्टरटेनमेन्टच्या मास्टर फराह खान यांचा मास्टरक्लास रंगला

by India Darpan
जानेवारी 20, 2025 | 4:52 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250120 WA0135 1

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चित्रपट बनवत असताना आपण आपली आवड जोपासत व्यावसायिक गोष्टींकडे जागरूकपणे पाहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक फराह खान यांनी केले.

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक फराह खान यांनी मास्टरक्लास’मध्ये उपस्थितांशी संवाद साधला. दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी या मास्टरक्लासचे संचलन केले.

पुढे बोलताना फराह खान म्हणाल्या, गाण्यातून चित्रपटाची कथा पुढे जाणे गरजेचे आहे. आयटम सॉंगपेक्षा अशी गाणी करणे मला जास्त आवडेल. एक कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून मला ही माझी ताकद वाटते. स्वप्न पाहिली तरच ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात येत असते.

कोरिओग्राफी आणि डायरेक्टर या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यासाठी लर्निंग प्रोसेस होती. कोरिओग्राफर म्हणून काम करत असले तरी दिग्दर्शक म्हणूनच काम करायचे हे पक्के ठरवले होते. त्यामुळे ओम शांती ओम सारखा चित्रपट केवळ चौदा दिवसात लिहून पूर्ण झाला. आपली आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते. माझ्यासाठी हीच बाब कायम महत्वाची आहे, असे फराह खान म्हणाल्या.

पुढे बोलताना फराह खान म्हणाल्या, इतरांसारखे वागण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचे वेगळेपण जपत कार्यरत राहणे गरजेचे आहे. तुम्ही जे स्वप्न पाहता ते ही सत्यात उतरवविण्यासाठी प्रचंड मेहनत काम करा. आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी संदर्भात स्वतः कारणे देण्यापेक्षा काम करत राहिले पाहिजे. या जगात अशक्य असे काहीच नाही, केवळ आपण विश्वास ठेवत मेहनत करणे आवश्यक आहे.

‘कभी हा कभी ना’ चित्रपट माझ्यासाठी जसा कोरिओग्राफर म्हणून महत्वाचा ठरला तसाच ‘ओम शांती ओम’ दिग्दर्शक म्हणून महत्वाचा आहे. चार चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील एकाला अपयश आले, मात्र अपयशाच्या कारणांचे विश्लेषण करून पुन्हा नव्याने कामाला लागले तरच आपण पुढे जाऊ शकतो असा विश्वास त्यांनी चित्रपटनिर्मिंती क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना दिला. जयप्रद देसाई यांनी फराह खान यांना बोलते केले. फराह खान यांनी अतिशय खुमासदार शैलीत उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिर्यानीची ऑर्डर पोहचविण्यासाठी गेलेल्या डिलेव्हरी बॉयला टोळक्याने केली बेदम मारहाण

Next Post

‘बोलीभाषेचा अभिमान असणे गरजेचे’…या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांनी व्यक्त केली अपेक्षा

Next Post
IMG 20250120 WA0293 1

‘बोलीभाषेचा अभिमान असणे गरजेचे’…या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांनी व्यक्त केली अपेक्षा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011