मुंबई – आपल्या रूपाने प्रत्येकाला मोहून घेणारी प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चनचे चाहते नेहमीच तिच्या चित्रपटाची वाट पाहात असतात. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. ऐश्वर्याने आपल्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी PS-1 म्हणजेच Ponniyin Selvan चित्रपटातून ती पुनरागमन करत आहे.
ऐश्वर्याने या चित्रपटाचा टिझर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यासोबत लिहिले, मणिरत्नम यांच्या पीएस-१ सोबत सोनेरी दिवस पुनर्जीवित होत आहेत. पीस-१ हा ऐतिहासिक चित्रपट तामिळ भाषेत चित्रित केला जात आहे. मद्रास टॉकिज ही कंपनी चित्रपटाची निर्माती आहे. तामिळ चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता विक्रम चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे.
विक्रम आणि ऐश्वर्या यांनी यापूर्वी मणिरत्नम यांच्या रावण चित्रपटात एकत्र काम केले आहे. रावण हा चित्रपट ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या करिअरमधील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक आहे. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या रावण फिल्ममेकिंगच्या दृष्टीने एक महत्त्वाचा चित्रपट आहे.
Raavanan शीर्षकासोबत चित्रपट तामिळ आणि Raavan या शीर्षकासोबत हिंदीमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित झाली होती. मणिरत्नम यांनी हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत चित्रित केला होता. रामायणापासून प्रेरित या चित्रपटात पृथ्वीराज यांनी रामाची आणि विक्रमने रावणाशी प्रेरित भूमिका केली होती.
पीस-१ मध्ये ऐश्वर्या काम करणार असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. पण प्रथमच ऐश्वर्याने अधिकृत अकाउंटवरून या बातमीला दुजोरा दिला आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर फॅन्सनी चित्रपटाचे स्वागत केले आहे. पीस-१ येत्या वर्षात प्रदर्शित होऊ शकतो.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला फन्ने खान हा ऐश्वर्या रॉय-बच्चनचा शेवटचा चित्रपट होता. त्यामध्ये अभिनेता अनिल कुमार आणि राजकुमार राव यांनी काम केले होते. त्यापूर्वी २०१६ मध्ये ऐश रणबीर कपूरसोबत ऐ दिल मुश्किल या चित्रपटात दिसली होती.