मुंबई – सौदर्यवती आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन हिचा एक फोटो सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. याच फोटोमुळे सध्या एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे, ऐश्वर्या पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे आणि ती पुन्हा एकदा गुडन्यूज देणार आहे का याची. यासंदर्भात ऐश्वर्या, तिचा पती अभिषेक किंवा सासरे अमिताभ यापैकी कुणीही याचा खुलासा अद्याप केलेला नाही. फोटोमध्ये ऐश्वर्या ही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. या फोटोतील ऐश्वर्या तिचा बेबीबंप लपवत आहे का, असा प्रश्नही सोशल मिडियात विचारला जात आहे.
ऐश्वर्याने चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. ती सध्या तामिळनाडूत आहे. पोन्नीईन सेलवन या चित्रपटाचे शुटींग नुकतेच पूर्ण केले आहे. ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची कन्ना आराध्या हे तिघेही चित्रपटातील सह कलाकार सरथ कुमारच्या घरी गेले होते. त्यावेळी शरथ कुमारची मुलगी आणि ख्यातनाम अभिनेत्री वरलक्ष्मीने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तोच हा फोटो आहे.