नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी व विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने धोरण आखावे अशी मागणी नाशिक येथील ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने केली आहे.
नाशिकच्या के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय येथील विद्यार्थिनीने वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. त्यानंतर तातडीने या प्रकरणात सखोल चौकशी करून काही गैरप्रकार आढळल्यास संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण आणि सत्य बाहेर यावे, हे अत्यंत महत्त्वाचे असेही त्यांनी सांगितले.
AISF च्या वतीने महाराष्ट्र शासनाला आणि सगळ्या शिक्षण संस्थांना आग्रह आहे की, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्वरित धोरणात्मक निर्णय घेतले जावेत. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींवर येणारा मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक ताण कमी करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची मालिका धक्कादायक आहे आणि शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला महत्त्व देणारे वातावरण निर्माण करणे काळाची गरज
AISF च्या नाशिक जिल्हाध्यक्ष प्राजक्ता कापडणे यांनी या मागणीचे पत्र प्रसिध्दीस दिले.